Thursday, April 9, 2020

आधार देण्याचा आधार

आधार देण्याचा आधार

त्यांची प्रकृती खूप खालावली होती. वय 82 वर्ष. त्या माउलीने सौंसारत 60 वर्षे अविरत अधिराज्य गाजवले होते. सर्व मुलाबाळांची,आणि कालांतराने नातवंडांची काळजी,त्यांना सतत जमेल तशी आणि तेव्हा मदत करणे, आधार देणे, ह्या माऊलीच्या अस्तित्वाला सार्थक करे. आता,अंथरूण धरले,तरी पक्याचे काय होणार,मक्याच्या मुलाला ऍडमिशन मिळाली का, चिंगीचं लग्न कधी होणार,......... वार्धक्य हे एक मोठे आवाहन असते. आजारपणं, क्षीण,थकवा, ह्या पलीकडे  वेळ घालवणे, हे सर्वात मोठे आवाहन.
पण त्याहून तीव्र मानसिक वेदना म्हणजे कुणाला  आधार देण्याची अवश्ययकता नाही, या सत्याला सामोरे जाणे.
    सतत कोणाला तरी आधार देणे, ह्याचा मानसिक आधार लागतो. मग, आधार देण्याच्या ह्याच गुणाचे काळजी करण्याच्या स्वभावात रूपांतर होते. जगात सर्वच आपापले युद्ध लढत असतात,आणि काळजी करून कुठलीही लढाई लढण्यास मदत होत नाही. उलटे, लढाई लढताना कोण तरी काळजी करतय,याचीच काळजी. पण,सवयीला औषध नाही. आधार देणाऱ्याला कुणाला तरी आधार देण्याची काठी लागतेच. The greatest need in life is to be needed. Being a support becomes the greatest support.
ही गरज दैनंदिन जीवनात नकळत आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते. मित्रमंडळी, नातेवाईक,आपतिष्ठ,हे आपल्या आयुष्यला अर्थ देण्यास महत्वपूर्ण  ठरतात. आधार घेणारा आणि देणारा,दोघे एकमेकांवर रेळून, आयुष्य जगत राहतात. आधार आर्थिक,बौद्धिक,भावनिक,अध्यात्मिक,कुठल्याही पद्धतीचा असू शकतो. बरेचदा,दुसऱ्याला आधार देणे,हेच आयुष्याचा एकमेव हेतू किंवा उद्दिष्ट बनते. ते निरपेक्ष म्हणवता येईल का? त्यालाच खरे, निस्वार्थ,शुद्ध प्रेम म्हणावे का?
खरे प्रेम न रेलणारे, निरपेक्ष,ताठ, दयातीत, गरज असेपर्यंत मर्यादित,आधार देण्याऱ्या आधाराच्या कुबड्या न लागणारे.
माझ्या वडिलांचे समरण झाले. त्यांचे आधार देणे ,हे त्यांच्या अहंकाराला सुखवण्यासाठी नव्हते. त्यांचा आधार,प्रेम,ह्यात कुठेही देणाऱ्याची भावना नव्हती. मी कित्येक दिवसात फोन केला नाही,तरी त्यांनी कधीच त्याचा उल्लेख सुद्धा केला नाही. त्यांचे माझ्या आयुष्यातले महत्व कमी झाल्याचे भय,किंवा असुरक्षिततेचा औंश नव्हता. त्यांची मदत,किंवा आधार घेतोय,या जाणिवेची सुद्धा अपेक्षा नव्हती. मदत करणाऱ्याला मदत घेणाऱ्या कडून या जाणिवेची तरी अपेक्षा असते. मग ते निरपेक्ष असते का?
 दुसऱ्याच्या आयुष्यात किती आधार देऊ शकतो ह्यात  स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधणे, ह्यालाच सौंसार म्हणायचे का?
स्वतःच्या आयुष्याला स्वतःच अर्थ द्यावा लागतो.
तो अर्थ सापडणे,हेच उद्दिष्ट असावे. दुसऱ्याला आधार देत देत स्वतःच्या आयुष्याला अर्थ  देणे हे कधीच होऊ नये.
डॉ दीपक रानडे.

No comments: