निर्लेप टेक्नॉलॉजि.
निर्लेप. स्वयंपाकाचा पूर्ण कायापालट करणारे तंत्रज्ञान. नॉनस्टिक टेकनॉलॉजि. सुटसुटीत,कमी तेल लागणारी,तब्बेतीला, रक्तवाहिन्यांना,हृदयाला संवर्धक. ही निर्लेपची भांडी स्वयंपाकघरात येण्यापूर्वी
माझ्या लहानपणी,आई बीडाचा जाडजूड तवा वापरायची. बरेचदा,त्या कालथ्याने जोर लावून,दात ओठ खाऊन, घावन,पानगी,डोसे यांच्या चिंधड्या झालेल्या समरणात आहे.मग कोणी सांगे, गरम झालेल्या तव्यावर कापलेल्या कांद्याने थोडे तेल चोळून मग डोसे घालायचे. काही तरी करून डोसा आणि तव्यातल्या अतिप्रेमावर निरोधक उपचार आपापल्या परीने सगळ्या गृहिणींचे असायचे. निर्लेप तवे आल्यावर ही धडपड एकाएकी संपली. अर्थात,ह्या तव्यांवर उलथणे सुद्धा लाकडी असणे गरजेचे होते. स्टीलचे वापरल्यास निर्लेपच्या कोटला जखम व्हायची. तो कोटला जीवापाड जपायला लागे.तो तवा म्हणजे गृहिणीला वरदानच ठरले.
मी आज 2 अंड्यांचे ऑम्लेट बनवत होतो. कांदा तांबूस परतून, मग मस्त हिरवीगार कोथिंबीर,आणि एकच मिरचीचे चार पाच तुकडे फोडलेल्या अंड्यात घालून, मनसोक्त फेटून,मग त्या निर्लेपच्या तव्यावर ओतले. 2 मिनिटे झाकण ठेवून मग झाकण उघडल्यावर मस्त थरथरत एका बाजूने ऑम्लेट शिजून तयार. ते कुठेही तव्याला चिकटले नव्हते. थोड्या तव्याच्या कसरती करून ते मस्त हवेत उडवुन पालटले. जय निर्लेप बाबा.
निर्लेप हे रसायन खरोखर किती भन्नाट आहे. टोस्ट बनवत असताना विचार आला, ही निर्लेपी टेकनोलॉजि आपल्या नात्यांमध्ये, स्वभावात आत्मसात केली तर कित्ती छान होईल? उगाच भावना आणि अपेक्षांमुळे नात्यांचे डोसे आपल्या मनाच्या तव्याला चिकटून बसतात. मग काही कारणामुळे नाते पलटायची गरज पडली,तर त्या डोस्याच्या चिंधड्या होतात. कितीही विवेकाचे, निरासक्तीचे तेल सोडले, तरी डोसा चिकटतोच. व्यावहारिकतेचे, प्रकटकॅलिटीचे निर्लेप कोटिंग मनाला लावून नात्यागोत्यांचे डोसे घातले,तर कुठेही डोसा न तुटता कमी तेल वापरून मस्त दोन्ही बाजूने न तुटता शिजतील. अध्यात्मिक वाटचालींकरता सुद्धा ही निर्लेप टेकनोलॉजि उत्कृष्ट. नाहीतरी सध्या social distancing ह्या संकल्पनेला ऊत आलाय. त्याचे औचित्य साधून, निव्वळ शारीरिक स्तरावर न ठेवता emotional social distancing ची सवय लावून घेतली पाहिजे. आणि त्याकरता सगळ्यांना उपयोगी पडणारी "निर्लेप टेक्नॉलॉजि ".ही टेक्नॉलॉजि खूप लोकं, अत्यंत यशस्वीपणे वापरताना दिसतात.कुरकुरीत,अत्यन्त पातळ डोसे बनवतात. पोट भरत नाही ह्या पातळ डोस्यांनी. जास्त डोसे खायचे.सहज सुलभ आणि फार महाग नसलेली. अवश्य वापरून पहा. मात्र,जरा लाकडी उलथणे वापरायचे लक्षात ठेवा. त्या लेपाला जपणे महत्वाचे.
डॉ दीपक रानडे.

No comments:
Post a Comment