दाते सर.
केमिस्टरी, या विषयातले अत्यंत मान्यवर प्राध्यापक. पुढे,आपल्या कर्तबगारी, प्रामाणिकता, सर्जनशील वर्तणुकीमुळे, SP कॉलेजचे प्रचार्यपद भूषवणारे. मितभाषी, संकोची, सतत हसतमुख,अत्यंत शांत, तत्वांशी कधीच तडजोड न करणारे,असे दाते सर. अनेक माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या बद्दल अजूनही दरारा असणारे. ते माझ्या आयुष्यात सासरे,या रुपात अवतरले. पांढरा शुभ्र पायजमा,पातळ कॉटनची शुभ्र बंडी, तितकेच शुभ्र व्यक्तिमत्व, आणि चेहेऱ्यावर स्मितहास्य. भेटल्यावर त्यांच्या चेहेऱ्यावर आनंद जाणवायचा. त्याचे कारण मी त्यांना मोबाईलवर नवीन ऍप्स दाखवायचो, neurosurgery केलेले स्कॅन्स दाखवायचो,एखाद पुणेरी विनोद सांगायचो. त्यांचा वेळ उत्तम जायचा. प्रत्येक वेळी निरोप घेताना नित्य नियमाने गाडी पर्यंत सोडायला येणारे दादा.
एकदा माझ्या बरोबर पवनाला घेऊन गेलो होतो. परतीच्या प्रवासात गप्पा मारत होतो.
ते कधीच चिडलेले बघितले नव्हते. मेधा कडून तिच्या लहानपणच्या आठवणीत सुद्धा, त्यांचा राग व्यक्त करण्याची पद्धत म्हणजे भोवया उंचावणे. आरडाओरडा,चिडचिड,अजिबात नाही.
मला उत्सुकता होती. मी त्यांना गप्पांच्या ओघात विचारले-" तुम्ही कधीच कोणाला झापलें नाही का?
कधीच दुसऱ्याला सल्ले,समज देण्याची वेळ आली नाही का?"
त्यांनी दिलेले उत्तर माझ्या मनात कायमचे कोरले गेले.
"दुसर्याने केलेली चूक,ही त्या व्यक्तीला आपण सांगून कधीच पटत नाही. त्या व्यक्तीला आपण बरोबरच आहोत असेच वाटते. चिडून काहीच साध्य होत नाही. मग उगाच कशाला बोलायचे? त्या व्यक्तीची वागणूक आपल्याला पसंत नाही, इतकेच आपल्या वागणुकीने व्यक्त करावे."
कालांतरात त्यांचा सहवास लाभत गेला. दर भेटीमध्ये मी त्यांचे जवळून निरीक्षण करायचो. दाते सर सतत स्वतःला व्यस्त ठेवत. कॉम्पुटर,आयपॅड,व्हायोलिन,घरातली कामे,टीव्ही. ठरलेल्या वेळी ठरलेले जेवण, कधीच कुठला अतिरेक,हट्ट,नाही. सगळ्या नातेवाईकांशी सामोपचाराने वागणे,कोणाशीच वैर नाही, कोणाबद्दल असूया नाही,कोणाबद्दल अपशब्द नाही,कोणाशीही स्पर्धा नाही. कोणालाच काही सिद्ध करण्याची धडपड नाही. कोणाची निंदा कधीच नाही, कोणाकडून काहीच अपेक्षा नाही. परिस्थिती, प्रसंग,जाणून, गरज असेल तेव्हा मदतीचा हात पुढे करणारे दादा. कुठल्याही गोष्टीचे स्तोम न करणारे,कुणावर ही नियंत्रण न गाजवणारे, मवाळ,रेशमी स्वभाव.
संवेदनशील,पण कुठेही भावनांचा उद्रेक नाही. कुठल्याही ऐहिक सुखाचा हव्यास नसलेले दादा. नवीन विषय जाणून घेण्याची अखंड जिज्ञासा,कुतूहल. त्यांची लवचिकता,सहनशीलता,मृदुपणा हृदयस्पर्शी वाटे. आयुष्यात, विचारात,वर्तनात एक लोभस,निर्भेळ,निर्मळ आटोपशीर नेटकेपणा. पूर्ण निर्व्यसनी,त्यांचा व्यक्तिमत्वाला निरागसतेचा सौम्य सुवास असून, अहंकाराचा दर्प कुठेच जाणवत नाही. त्यांचे भावनिक,आर्थिक,शारीरिक स्वावलंबन, त्यांच्यात असलेली एक आगळी आत्मतृप्तता,ह्या गोष्टी पदोपदी जाणवतात. वयाच्या 82 वर्षी सुद्धा उत्तम गाडी चालवणारे दादा. कर्मकांड,उपास तपास न करणारी, पण तरी अध्यात्मिक असणारी ही व्यक्ती.
मी दाते सरांकडून केमिस्टरी शिकलो नाही,याची चुटपुट होती,पण आयुष्याच्या अभ्यासक्रमात दिलेली शिकवण कित्येक जास्त मोलाची. दाते सरांनी केमिस्टरी मध्ये PhD पूर्ण केली नाही. पण आयुष्य जगण्याच्या विषयात त्यांच्या PhD बद्दल कोणालाच शंका नसावी. He taught me the greatest science I ever learnt in my life. The Science of contentment. A Professor of Science who perfected the Art of Living.माझ्यासाठी ते खऱ्या अर्थाने Dr Date आहेत.
डॉ दीपक रानडे.

No comments:
Post a Comment