गडगडलेली साम्राज्ये
गेल्या 2 ते 3 वर्षात,माझ्या जवळच्या परिचित,अथवा मित्रमंडळींच्या परिचित असलेल्या 5 -6 प्रथितयश, प्रस्थापित,मोठाले व्यावसाय असलेले रथी महारथी, बघता बघता पत्त्यांच्या घरा सारखे कोलमडताना बघावे लागले.खूप दुःख होत होते. याचे कारण मला स्वतः काही प्रमाणात आशा परिस्थितीतुन जाण्याचे दुर्भाग्य लाभले. प्रवास सुरु करताना अपार कष्ट,डोळ्यात स्वप्ने,कमालीची जिद्द,कुठल्याही अडचणीवर मात करण्याची धमक, या सर्व गुणांच्या जोरावर यशाच्या पायऱ्या अगदी झपाट्याने चढण्याचा नशाच काही और असतो. आपल्या समाजात पैश्याला अवाजवी महत्व दिले जाते, आणि श्रीमंतांच्या भोवती पिंगा घालणे,हे सर्वत्र दिसते.
पैसा कसा कुठे कुठल्या मार्गाने कमावला, हे फारसे महत्वाचे नसते. उगवत्या सूर्याला वंदन करणारी मंडळी पुढे मागे करत असल्यामुळे,अहंकार अजूनच बळावतो. इंग्लिश मध्ये एक चपखल वाक्प्रचार समरतो.
Nothing succeeds like success
यशाचा,कौतुकाचा,आर्थिक सुबत्तेचा नशा खरोखर खूप झिंग आणतो. बघता बघता, जीवन शैली बदलते.कपडालत्ता, क्लब, पार्ट्या,गाड्या,बंगले, सलेब्रिटीं बरोबर घसट ओघाने येतेच. आपली एक प्रतिमा तयार करण्याची धडपड. मग कालांतराने ती प्रतिमा टिकवण्याची धडपड.
या मार्गावर कूच करताना, अहंकाराचा राक्षस सद्सद्विवेकाची,तारतम्याची सर्जनशीलतेची हत्या करतो. या हत्येमध्ये हाव, मत्सर,स्पर्धा, त्या राक्षसाला सहकार्य करतात. एकदा का यांचा बळी गेला, की मग पाय जमिन सोडतात,आणि वास्तवाशी सम्पर्क तुटतो. आपल्या यशामध्ये अनेक व्यक्तींचा,परिस्थितीचा,,नशीबाचा वाटा असतो, याचा विसर पडतो,आणि यशाचा धनी सर्वस्वपणे मी, व माझे कर्तृत्व अशी भावना जागृत होते.
Success has many fathers, failure is an orphan. हे खरोखर एक सत्यवचन आहे.
निर्णय,अंदाज, पैशाची गणिते, सर्व हळू हळू बिघडू लागतात. चुकलेले अंदाज,निर्णय,अहंकार कबूल करून देत नाही. हितचिंतकांचे सल्ले धुडकावून,मीच तो काही शहाणा,इतर लोकांना vision नाही,वगरे वगरे.योग्य वेळी माघार घेणे, हे सुद्धा पौरुषत्वाचे महत्वाचे लक्षण मानले जाते. पण हे शहाणपण येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. पुन्हा इंग्लिश मधला वाक्प्रचार परिस्थितीचे योग्य वर्णन करतो.
Running a large business is like riding a tiger. You can't get down.
हाताखाली असलेल्या लोकांचे पगार,बँकेचे हप्ते,ह्यातून सुटका नाही. मग एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा खणायचा. बघता बघता प्रवास आर्थिक खड्ड्यांमुळे खडतर होऊ लागतो. बघता बघता कौतुकाची सुमने उधळणारी मंडळी आता तेवढयाच जोमाने मुक्तहस्त टीकेची झोड उधळू लागतात.
"मी आधीच सांगत होतो, त्याचं काही खरं नाही" वगरे वगरे.
या मंडळींचे नेमके काय चुकले? ह्या गोष्टीवर खूप चिंतन केले माझ्या मनात.
दैव? बदलती राजकारणातली समीकरणे, राजकिय निर्णय, हावरटपणा? व्यवसायाकडे दुर्लक्ष? स्वतःच्या क्षमतेचा चुकलेला अंदाज ? बदललेला स्वभाव, उन्मत्त मजुरडे पणा? वाढलेले खर्च?
व्यवसाय वृद्धी साठी, छोट्या गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा 2 ते 3 टक्के अधिक व्याजाचे आमिष दाखवून पैसे उभे करायचे. ही सुद्धा एक प्रकारे, गुंतवणूकदारांच्या हावरटपणाची अभिव्यक्तिच म्हणावी लागेल. 2 - 4 टक्के जास्त व्याज मिळण्याच्या हव्यासापायी भांडवल धोक्यात टाकतात ही मंडळी. आशा पद्धतीने भांडवल उभे करणे जरी सोपे असले,तरी इतक्या प्रमाणात व्याज देणे कालांतराने कठीण ठरते. व्यवसाय वाढवण्याची घाई बऱ्याचदा अंगाशी येते. व्यवसायाची नैसर्गिक पद्धतीने वाढ याला organic growth म्हणतात. व्यवसाय हावरट पणामुळे किंवा स्पर्धेमुळे वाढवणे inorganic, किंवा कृत्रिम असते. ज्या पायऱ्या चढताना खूप मज्जेत चढतो,त्याच उतरताना खूप क्लेशकारी ठरतात. बरेचदा,त्या आठवणी सुसाह्य करण्यासाठी दारू,किंवा इतर व्यसनाचा आधार घ्यावा लागतो. कधी काळी गाजवलेले दिवस,वैभव,ह्या गोष्टी खूप त्रास देतात. यश कमावणे एकवेळ सोपे असते पण ते टिकवणे खूप कठीण.
The greatest curse for a man who dreamt and achieved, is to revisit the ruins of the Empire that he once built.
सरते शेवटी, हा सगळा खेळ दैवाचाच असावा. दैव म्हणजे त्या त्या वेळेला येणारे विचार. त्या घटके मध्ये बरेच वेळा, अनाकलनीय वर्तणूक आणि अनपेक्षित भूमिका घेतली जाते. आणि दैवात जर भोग भोगणे असेल, तर मग 'विनाश काली विपरित बुद्धी',हेच खरे असावे.
डॉ दीपक रानडे.

No comments:
Post a Comment