एन्ड पॉईंट
कोरोना वायरस ने पुर्ण जगाला आपल्या विळख्यात घट्ट आवळून टाकलंय. मी वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे थोड्याफार हालचाली करू शकतो. हॉस्पिटल मध्ये जाणे, फक्त तातडीक सेवा पुरवणे,आणि मग घरी बसून वाचन,लेखन,टीव्ही, गाणी ऐकणे,सॅक्स वाजवणे, अशा आवडणाऱ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये रमून जाणे.
घरी हातभार लावण्याच्या हेतू पोटी,मी रोज सगळी भांडी धुतो. हॉस्टेल मध्ये असताना कपडे व भांडी धुणे, क्वचित काळी झाडलोट सुद्धा केली असल्यामुळे काहीच वावगं वाटत नाही.
आज सकाळी, स्टीलचे दुधाचे भांडे घासत होतो. घासणी थोडी साबणात बुडवून त्या भांड्याला तिरपे करून जरा जोर लावून घासायला लागलो. दुधाचा ओशटपणा घालवायला थोडी मेहेनत लागत होती. भांड्याच्या कडा,आतली बाजू,तळाशी थोडे करपलेले अवशेष,सर्व साफ करत आपल्याच नादात होतो. अखेरी, समाधान झाल्यावर स्वछ वाहत्या पाण्याखाली ते भांड धरले. काही क्षणात ते डागाळलेलं,बुळबुळीत भांड लक्ख होऊन चकाकू लागलं. चुरचुरीत,चकचकीत,उजळ झालेलं भांडं हातात धरायला खूप छान वाटत होतं.
आनंद कशामुळे झाला? असे काय मोठे काम केले होते मी? आजूबाजूला कौतुक करणारी कोणी व्यक्ती सुद्धा नव्हती. पण खूप मस्त वाटत होतं हे खरे. याची कारण मीमांसा करू लागलो.
या क्रियेचा तो विशिष्ट एन्ड पॉईंट होता. एन्ड पॉईंट,बद्दल कुठलीही शंका नाही,सौंशय नाही,आणि कार्य पूर्ण झाल्याचे समाधान. कार्य सिद्धीस नेण्याची एक तृप्त भावना. आपण आयुष्याच्या वाटचाली मध्ये बरेच उद्योग करत असतो. व्यवसाय,छंद, फिटनेस,वगरे वगरे अनेक ऍक्टिव्हिटीस. बर्याच केसेस मध्ये,ठरावीक एन्ड पॉईंट नसतो.
एन्ड पॉईंट पर्यंत पोचण्याची, येणाऱ्या कोणत्याही अडचणीला सोडवू शकू याची खात्री होती. एन्ड पॉईंटला पोचू की नाही,ही काळजी नव्हती. तिथे पोचायला कोणाच्या मदतीची गरज नव्हती.
मग कुठेतरी वाचल्याचे आठवले. रूटीन घर कामे करणे, डी-स्ट्रेसिंग असते. कुठलीही अपेक्षा न बाळगता,कुठलाही ताण न निर्माण करणाऱ्या डेफिनिट एन्ड पॉईंट असलेल्या ऍक्टिव्हिटीज, सूक्ष्म सेन्स ऑफ आचिवमेंट निर्माण करतात. मन त्या क्षणाला भांडं चकचकीत करण्यामध्ये पूर्ण केंद्रित होते. हा अनुभव शस्त्रक्रिया करताना सुद्धा येतो,पण तेव्हा अंतर्मनात कुठेतरी ताण असतोच. कुणाच्या जीवाशी खेळत असल्याची जाणीव सुप्त का होईना, मनाच्या गाभार्यात खोचलेली असतेच. अर्थात, शस्त्रक्रिये नन्तर पेशंटच्या चेहऱ्यावर व्याधी मुक्त हसू पाहण्याचा आनंद अवर्णनीय असतो. तरी देखील प्रत्येक शस्र क्रियेत सर्व गोष्टी मना प्रमाणे,डेफिनिट एन्ड पॉईंट साध्य करणे अवघड असते. बऱ्याच गोष्टी आपल्या होता पलीकडे असतात,यालाच अनुभव म्हणतात.
पण भांड धुण्यासारखी छोटी छोटी कामे करताना त्या कामात एकरूप होऊन तणाव मुक्त हालचाली करणे खरच therapeutic असते. खऱ्या अर्थाने निरपेक्ष कर्मयोग. कर्तेपणाचा अहंकार विरघळून टाकणारी क्रिया. एन्ड पॉईंट चे वैशिष्ठ म्हणजे हा पॉईंट पूर्ण प्रेडिकटेबल असतो. अनिश्चितता अजिबात नसते. आयुष्य जगताना,अपघात झालेले रुग्ण बघताना, अनिश्चिततेचि पदोपदी जाणीव होत असते. अशा अनिश्चित, अशाश्वत जगात, डेफिनिट एन्ड पॉईंट, हे कुठेतरी मनाला शांतता बहाल करते. आयुष्यात थरारक क्षण जितके महत्वाचे, तितकेच हळुवार उलगडणारे निवांत क्षण महत्वाचे. आनंदाला निरागसतेचा,स्वभावीकतेचा सुवास असलेली एक वेगळी अनुभूती.
योगाची व्याख्या "चित्त्ववृत्ती निरोध' अशी केलेली आहे. भांडं धुताना चित्ताला एकाग्र करून, निवृत्तीचा स्वानुभव घेता आला. कोणास ठाऊक, नशिबात असले,तर भांडी धुता धुता आत्मसाक्षात्काराचा अनपेक्षित एन्ड पॉईंट येऊ शकेल सुद्धा.पण त्या क्षणी,अनुभव घेणारी व्यक्तीच हरपलेली असेल. आत्मसाक्षात्कार कोणाला आणि कोणाचा? त्या परमतत्वाशी विलीन झाल्यावर जाणीव नेणीवेच्या पलीकडे उरते ते केवळ शुद्ध ब्रह्म.
डॉ दीपक रानडे.

No comments:
Post a Comment