डोन्ट बी जजमेंटल
वसंताकडे त्याच्या परदेश दौऱ्यानंतर भेटण्यास गेलो. घरी पोचल्यावर त्याच्या विशिष्ट शैलीला अनुसरून माझे योग्य त्या ठिकाणी बसवून देऊन पाणी वगरे आतिथ्य करण्यात आले. त्याचे घर म्हणजे antique कलाकृतींचा खजाना. लाकडी दरवाजे, दिवाण,बैठका,झुंबरे, एका अनोख्या पुरातन काळात घेऊन जातात. एका प्रकारचे Time travel. खूपच एस्थेटीक, आणि भुरळ पाडणाऱ्या त्या देखण्या वास्तूला न्याहाळत बसलो होतो.
मग त्याने त्याच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या त्याच्या ऑफिस मध्ये बोलावून घेतले.
कॉम्पुटर चालू होता, आणि मी बसल्यावर दोनच मिनीटात वसंता आला. सौजन्याचे दोन चार मोजके शब्द बोलून झाल्यावर त्याने त्याच्या दौऱ्याची इथंबूत माहिती दिली. खूप वेगळे,मजेशीर अनुभव त्याने तितक्याच रोचक शैलीत वर्णनविले.
मग विषय वळला त्याच्या गरुडमाची येथील लीडरशिप वर्कशॉप कडे. महिन्यापूर्वी मी त्याच्या म्हणण्यानुसार दोन दिवसाच्या वर्कशॉप मध्ये फक्त ऑबझर्वर म्हणून सहभागी झालो होतो. मला त्याची कार्यपद्धधती जाणून घ्यायची होती. त्याने कॉर्पोरेट औटबॉउंड ट्रेनिंग मध्ये आपले एक वेगळ्याच उंचीचे स्थान कमावले होते. मला त्याबद्दल खूप कुतुहल आणि जिज्ञासा होती.
ते वर्कशॉप संपल्यावर वसंत लगेच परदेशी गेला त्यामुळे आम्ही भेटू शकलो नाही आणि त्याबद्दल चर्चा सुद्धा करता आली नाही.
मला त्याने वर्कशॉप मध्ये सहभागी होण्यापूर्वी स्पष्ट सांगितले होते" तू एक टेबल किंवा खुर्ची सारखे निव्वळ ऑबझर्व करायचं आहेस". तसे त्याने सहभागी झालेल्या मेंबर्सची संमती घेऊन माझी ओळख करून दिली.
वर्कशॉप खूपच क्रीएटीव्ह होते. विविध गेम्सच्या माध्यमातून मेम्बर्सच्या स्वभावातल्या वेगवेगळ्या छटा अनावधानाने व्यक्त होत होत्या आणि वसंताची तीक्ष्ण नजर त्याना टिपत होती. नयूरोसर्जरी मध्ये मी जसे हळुवार पणे डिसेक्शन करत आत पोचतो, तशाच काहीश्या प्रकारे तो त्याची इमोशनल नाइफ वापरुन स्वभावातील सुप्त लकबी, बारकावे, कंगोरे सर्जिकल कौशल्याने,अलगदपणे अनावृत्त करत होता. गेम्स संपल्यावर प्रत्येकाच्या वर्तनाचे सखोल विश्लेषण अत्यंत नाजूकपणे केले जात होते. एका ठिकाणी, मला माझ्या व्रताचा विसर पडला आणि मी एका मेम्बर बद्दलचे माझे मनोगत व्यक्त केले. वसंताने क्षणात माझा मुद्दा बाजूला करत पुढे गेला.
आज आम्ही भेटलो,तेव्हा तो मला त्या प्रसंगाबद्दल उद्देशून मला माझी चूक थंडपणे समजावत एक खूप महत्वाच्या तत्वाबद्दल प्रबोधन केले.
त्याचे शब्द अजून कानात रेंगाळताहेत. 'समोरच्याचे मूल्यांकन( जजमेंट) करणे,ही सगळ्यात मोठी चूक तू केलीस. जजमेंट करून त्या व्यक्तीचे वर्गीकरण करण्याची सवय लागली असते आपल्याला. ही सवय कालांतराने जाणिवेच्या खलील पातळीवर,अनावध, स्वेच्छारहित (subconsciously, involuntarily) होऊन जाते. ती आपण कटाक्षाने टाळली पाहिजे'
त्याच्या ह्या विधानाचा माझ्या खूप खोलवर प्रभाव पडला. समाजात वावरत असताना आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व लोकांच्या बाबतीत हे माझ्या हातून घडत होते. परिचितांचे वेगवेगळ्या पद्धतीने आपण वर्गीकरण करतो. बौद्धिक,सामाजिक,आर्थिक,भावनिक,धार्मिक व अशाच अनेक प्रकारचे,निकष वापरून आपण आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल जजमेंट रेखाटतो. त्याच जजमेंटच्या आधारे पुढील सर्व गाठीभेटी, त्या व्यक्तीने केलेली वागणूक व त्याचा अर्थ,सर्व काही त्या भिंगातून आपण बघत असतो. समाजात, अगदी जुजबी माहिती असून देखील कुठल्याही व्यक्ती बद्दल अभिप्राय व्यक्त करणे हे तर मी स्वतः अनुभवलंय. माझ्या बद्दल अनेक चर्चा,जजमेंट कानावर आल्या आहेत. असे असून देखील,मी स्वतः तेच करत होतो.
वसंताशी गप्पा मारता मारता, एक खूप प्रगल्भ दृष्टिकोन समोर आला. त्याच्या राहत्या घरातील पुरातन decor, आणि त्याची अत्यंत आधुनिक विचारसरणी, हे किती परस्पर विरोधी होते. कोणत्याही व्यक्तीबद्दल,परिस्थिती बद्दल कुठलेच bias, opinion, न ठेवता,नॉन जजमेंटल, अलिप्त, राहिल्यास आयुष्य खूप रुचकर आणि सुखकर होते. वसंताच्या यशामागे,आयुष्यात कुठलेच भिंग न वापरणे,ह्या तत्वाचा खूप मोठा वाटा असणार,याची खात्री पटली. हे तत्व त्याच्या मैत्रीत, त्याच्या वैचारिक बैठकीत,त्याच्या वर्तणुकीत पदोपदी जाणवत होते. पण, हे जजमेंट सुद्धा बाजूला ठेवून, एका चांगल्या मित्राचा निरोप घेऊन मी घरची वाट पकडली.
डॉ. दीपक रानडे

No comments:
Post a Comment