गुलदस्त्यातले समाजकारण
समाज,चारचौघे,लोकं हे तसे चेहरा,ओळख नसलेले. कदाचित,समाजातल्या अलिखित, नीतिमत्तेच्या नियमांचे रक्षण करणारी अज्ञात संस्था. समाजातल्या प्रत्येकावर एक अत्यन्त महत्वाचा प्रभाव.
एखाद्याने ह्या अलिखित नियमांचे उल्लंघन केले,तर त्याच्या अथवा तिच्या वर आक्षेप,आरोप,समीक्षेची झोड उठवण्याचे अत्यन्त महत्वाचे काम करणारे हे चारचौघे.
तसे म्हंटले,तर ही एक प्रकारची सौंस्थाच. या सौंस्थेचे सभासद म्हणजे, चौकटीत वावरणारे,आर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या सबळ असलेले,चकाट्या पिटणारी निरुद्योगी,कीटी पार्टी मंडळी, स्वतः बंड करण्याची इच्छा असलेले,पण धमक नसलेले अतृप्त आत्मे. ह्या सौंस्थेला तसे आपल्या सौंस्कृतीत खूपच महत्व. लहानपणे हिंदी पिक्चर मध्ये,"बिरादरी के खिलाफ जाके" पळून जाऊन लग्न करणारे हिरो हेरॉईन खूपच भावायचे. तेव्हा विरोध करणे म्हणजे किती रोमँटिक,डेरिंग आणि डॅशिंग वाटायचे.
समाजाच्या नैतिकतेचा धुरा समभाळणाऱ्या आशा अनेक मंडळींशी प्रत्यक्ष,किंवा अप्रत्यक्ष संबंध गेल्या 3 दशकात आला. कॉलेज मध्ये असल्या पासून ह्या चार चौघांनी कधी पाठच सोडली नाही. सभासद बदलत राहिले,पण संस्था कायम.
इतरांच्या आयुष्यात डोकावून, कुणाकडून मिळालेल्या अर्धवट माहितीच्या आधारे, मनसोक्त तोंडसुख घेणारे हे हंगामी सभासद.
समाजात प्रत्येक व्यक्तीला एक सामाजिक लेबल लावण्याचे मौलिक काम करणारी ही मंडळी. हे शिक्के, त्या त्या व्यक्तीची कालांतराने ओळख बनून रहातात.
तो ना ? तो तर ........च आहे
ती तसलीच आहे
वगरे वगरे
आणि ही जजमेंट्स अत्यन्त छातीठोक पणे खात्रीशीर असल्याचा अविर्भावात केली जातात. सभासद आपापल्या वैयक्तिक आयुष्यात ह्या नियमांचे कितपत पालन करतात, हा एक वेगळाच विषय. तरी, इतरांवर शाब्दिक वार करणारच. चोरी पकडली गेली नसल्यामुळे,आपण धुतल्या तांदुळा सारखे, विनापाश. हे स्वयंघोषित moral police किती दांभिक असतात याची प्रचिती अनेकदा झाली.
लफडी करणे, लाच घेणे,व्यसनं असणे अजिबात चुकीचे नाही. ती गुलदस्त्यात ठेवता न येणे,हीच चूक.
गुलदस्त्यात लपणारे हे भ्याड किडे.सगळंच चोरीछुपे.इतर वेळी,कुठे काय, कुठे काय,"तो मी नव्हेच" चे बुरखे घालून इतर लोकांवर ताशेरे ओढायला हजर.
दांभिकता, ही एक कला आहे. सगळे करून सावरून समाजात ताठ मानेने चालणे, हा एक प्रकारचा रॅम्प वॉक .केलेल्या दुष्कृत्यांचा कुठेही सुगावा न लागून देणे, हे खरे कसब. शेवटी,माणूस हा सगळीकडे सारखाच कोणीही कितीही नैतिकतेच्या बढाया मारल्या तरी. याचा अर्थ नैतिकतेची ऐसीतैशी,असे अजिबात नाही.
नैतिकतेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या दांभिक मानसिकतेवरचा हा रोष आहे. कोण व्यक्ती,कुठल्या प्रसंगातून गेलाय,त्याचा जीवनाचा प्रवास, त्याच्या आयुष्यातील कटू प्रसंग,आणि त्याने घेतलेले निर्णय याचा उलगडा नसताना त्या व्यक्तीची शाब्दिक शिकार करणे हे दुर्दैवी. स्वतःचे ताट भरलेले असताना दुसऱ्याची भूक समजणे खरंच कठीण असते. गुलदस्त्यात आयुष्य व्यतीत करणारे, रस्त्यावरच्या पारिजातकाच्या फुलांची मानसिकता कधीच समजू शकणार नाही. किंबुहना,त्यांनी तो प्रयत्नच न करणे,हे इष्ट.
डॉ. दीपक रानडे
Society, others, people, peers all faceless entities, but an institution to safeguard the unwritten codes of conduct in society. Nonetheless, a very powerful influence on everyone.
An institution entrusted with the onerous task of reprimanding, criticizing and ostracizing anyone, who dares to beach the invisible implicit protocols. A club of moral high priests, members of which are the pseudo conformist, successful wealthy individuals, or then the largely time whiling kitty party types or then those meek, timid and disgruntled souls, harboring latent ambitions of breaking the norms, but never blessed with the courage to do so. This intangible institution however has great importance in the cultural ethos of every society.
Back in our childhood, there were many a movies made on the theme of eloping lovers, with scant regard to social norms. The protagonists really appealed to me at that tender age, and their acts of dissidence appeared so daringly romantic and dashing. Have had the privilege of either directly or indirectly dealing with these high priests of morality who bear the huge responsibility of guarding against moral decadence in the last three decades. The members have changed, but the institution remains unfettered. These social voyeurs who never spare the opportunity to peep into the lives of others and castigate and assassinate their victims with highly insufficient facts or knowledge.
These slaves of opinion doing service to society by labeling their subjects, which eventually become their identities.
That guy is an incorrigible........
She always was a loose........
Etc Etc.
These verdicts and judgements are passed with complete conviction and confidence.
How many of this breed flout the very norms they preach is entirely another matter. They will relentlessly attack with their razor sharp verbal onslaught.
Their reputations kept intact, merely because their corruptive immoral acts remain unexposed. Have witnessed the doublespeak of this hypocritic tribe on many an occasion. Illicit affairs, vices, corrupt practices by themselves are not a crime. The inability to keep these under wraps is what constitutes a crime.
These people are the parasites infesting the bouquet of secrecy. Scheming wolves donning the sheepskin of virtue, always geared up to pounce on the next victim.
Hypocrisy is an art. The ability to stand tall and strut around, a skill of confidently walking the ramp. The acumen of adroitly shrouding their indiscretions.
Human beings are pretty much the same, no matter how loudly anyone rants about the virtues of morality. I do not wish to target morality or virtue, but rather the hypocritical mindset of its preachers and propagators. It's really unfortunate to see these perpetrators launch a relentless hunt without being privy to the circumstances, unfortunate turn of events, or sheer misfortune of their victims. Their contented bellies can never be in a position to interpret the angst of a famished soul.
Moral ostracism that's more a travesty of justice. The flowers that rest comfortably ensconced in a bouquet can never comprehend the perils of a flower blown away by the furious storm of circumstances.
Dr. Deepak Ranade.